Sunday, March 16, 2025

जमीन नोंदीसाठी १० हजाराची लाच घेताना तलाठ्याला अटक

चुलत्या-पुतण्यांनी आपसात खरेदी केलेल्या जमिनीची नोंद करुन सातबारा उतारा देण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना तडसर (ता.कडेगाव) येथील तलाठी वैभव तारळेकर याला गुरुवारी अटक करण्यात आली. तक्रारदार व पुतण्या यांनी एकमेकांस विक्री केलेल्या शेतजमिनीची ७/१२ सदरी नोंद घेवून ७/१२ उतारा देणेकरीता तलाठी तडसरचे तलाठी वैभव सुभाष तारळेकर यांनी तक्रारदार यांचेकडे १० हजार रुपये लाच मागणी केली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पडताळणी केली असता लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी कडेगाव तडसर रोडलगत असले कृष्णा अपार्टमेंट या ठिकाणी सापळा लावला असता तलाठी श्री. तारळेकर, यांना १० हजार रूपये लाच रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले आहे.

तारळेकर यांचेविरुध्द कडेगाव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अमोल तांबे, अप्पर अधीक्षक विजय चौधरी, उप अधीक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, पोलीस अंमलदार प्रितम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषीकेश बडणीकर, चंद्रकांत जाधव, सुदर्शन पाटील, पोपट पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, चालक वंटमुरे यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles