Thursday, September 19, 2024

तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…’ असे झाले आहे… थोरातांचाही विखेंवर पलटवार…

तलाठी भरती घोटाळ्यावरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करताना आमदार रोहित पवार यांनी त्यांना गोपनीय फाईल उघड करण्याचे आव्हान दिले आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगरमध्ये तलाठी नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात भरती प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सांगितले होते. परंतु, बाळासाहेब थोरात आणि रोहित पवार यांनी या प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता.

विखे पाटलांनी भ्रष्टाचार सिद्ध झाल्यास राजकीय संन्यास घेण्याचे आव्हान दिल्यानंतर रोहित पवार यांनी ट्विटरवरून विखे पाटलांना प्रतिआव्हान दिले आहे. पवारांनी म्हटले आहे की त्यांनी विखे पाटलांना गोपनीय फाईल DM केली आहे, ज्यामध्ये भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट आहे.
यानंतर आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विखेंवर व्टिट करून निशाणा साधला आहे. त्यांनी व्टिटमध्ये म्हटले आहे की,

महसूल मंत्री @RVikhePatil

तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या,
असे मी म्हणणार नाही.

मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठविला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे सुद्धा जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. या शिवाय तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा ‘पारदर्शक कारभार’ उघडा पडेल.

बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसूल मधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे, सत्य काय ते सगळ्यांना माहित आहे.

तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को…’ असे झाले आहे.

(आ. @RRPSpeaks
यांनी तुम्हाला अहवाल पाठवला आहे, पाहिजे असल्यास मी ही पाठवतो)
https://x.com/bb_thorat/status/1819992556546982323

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles