आज राज्यभरात अनेक ठिकाणी लागलेल्या तलाठी भरती परीक्षेच्या निकालात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे.
राज्य शासनाने अनेक प्रयत्न करूनही यामधील घोटाळे बंद व्हायचे नाव घेत नाहीये. पेपरफुटी व हे घोटाळे कायमचे बंद करण्यासाठी कठोर कायदा आता व्हायला हवा, अशी ठाम मागणी विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.