मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील (एन. के. पाटील) यांना मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणं भोवलं आहे. एन. के पाटील यांचे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर यांनी हे आदेश काढले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 1 जून रोजी एन. के. पाटील यांनी धोकादायक पद्धतीने चारचाकी वाहन चालवत तळेगाव येथे दोन वाहनांना धडक दिली होती. तपासात त्यांनी मद्याचे सेवन केले असल्याचे आढळून आले होते. तसे रिपोर्ट न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेतून प्राप्त झाले होते.