एका हौशी गायिकेचा व्हिडीओ व्हायरल होत होत आहे. ती आशा भोसले यांनी गायलेलं ‘शरारा शरारा’ हे गाणं गाताना दिसतेय. हा व्हिडीओ @desimojito या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांचीच बोलती बंद झालीये. कारण ही महिला ज्या पद्धतीनं गाणं गातेय ते पाहून काय बोलावं हेच कळत नाही. म्यूझिक आणि शब्द यांचा काहीच मेळ लागत नाहिये. बरं, हे कमी होतं म्हणून की काय मूळ गाण्याचे लिरिक्सच त्या महिलेनं बदलून टाकले आहेत.
- Advertisement -