लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी गोष्ट म्हणजे सॉस. चायनिस असो, पिझ्झा, सॅंडवीच, चपाती सर्वांसोबत सॉस आवडीनं खाल्ला जातो. मात्र हा टोमॅटो सॉस कसा बनवला जातो याविषयी तुम्हाला माहितीय का? टोमॅटो सॉस बनवतानाचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये कारखान्यातील काही दृश्य दिसत आहे. यामध्ये टोमॅटो सॉस बनवण्याची काही प्रक्रिया दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर कोणालाही किळस येईल. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, टोमॅटो कारखान्याबाहेर पडले आहेत. टोमॅटो ट्रकमध्ये ठेवले असून ते सडलेले दिसत आहेत. आता या कुजलेल्या टोमॅटोपासून सॉस बनवायचा आहे की फेकून देण्यासाठी काढले आहेत हे व्हिडीओमध्ये स्पष्ट होत नाहीय. मात्र व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून लोक संताप व्यक्त करत आहेत.
तुमच्या आवडीचा टोमॅटो सॉस असा तयार होतो….खाताना दहा वेळा विचार कराल…व्हिडिओ
- Advertisement -