डान्सर गौतमी पाटीलने तिच्या नृत्याने प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. गौतमी पाटीलने तिच्या अदा आणि डान्सने शहर आणि खेड्यांमधील तरुणांना वेड लावलं आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या मराठी सेलिब्रिटीमध्ये गौतमीचे नाव घेतलं जात आहे.
याचदरम्यान, गौतमी सारख्या दिसणाऱ्या एका नव्या डान्सरने नृत्य क्षेत्रात एन्ट्री केली आहे. ही नवीन डान्सर दिसायला सेम टू सेम गौतमी सारखीच आहे. गौतमी पाटील सारख्या दिसणाऱ्या डान्सरने फार कमी कालावधित मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे गौतमी पाटीलने ‘माझा कारभार सोपा नसतोय रं’, ‘दिलाचं पाखरू’, ‘सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम’, ‘पाटलांचा बैलगाडा’ या गाण्यांतून तरुणाईच्या मनावर गारुड निर्माण केलं आहे. याच अनेकांच्या ‘दिलो की धडकन’ असणाऱ्या गौतमीची ‘डुप्लिकेट कॉपी’ मार्केटमध्ये आली आहे.
गौतमी पाटील सारख्या दिसणाऱ्या डान्सरचं नाव आहे तनुश्री पुणेकर. तनुश्री ही लावणी कलाकार आहे. तनुश्री हुबेहूब गौतमी सारखी दिसते. तनुश्री फक्त गौतमी सारखी दिसत नाही, तर डान्स, अदाकारी, बोलणं अशा अनेक गोष्टी गौतमी सारख्या आहेत.
गौतमी सारखा तनुश्रीचाही राज्यभरात मोठा चाहता वर्ग आहे. तिच्या नृत्याच्या कार्यक्रमालाही मोठा चाहता वर्ग हजेरी लावतो. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होते. तनुश्रीसोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची झुंबड पाहायला मिळते.