Sunday, July 14, 2024

शरद पवार ॲक्शन मोडमध्ये… विधानसभेसाठी जाहीर केला पहिला उमेदवार…

ज्येष्ठ नेते शरद पवार हे सोमवारी सांगलीच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी आर. आर. पाटील यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलतांना पवार म्हणाले की, आमदार सुमनताई पाटील यांच्यानंतर आता रोहित पाटील यांच्या पाठीशी राहा, येणाऱ्या काळात तुम्ही रोहितला ताकद द्या. चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका आहेत. या विधानसभेत काहीही झालं तरी सत्ता परिवर्तन करायचं, त्यासाठी रोहितला साथ द्या, असं पवार म्हणाले.

तासगावमधून सुमनताई पाटील या सध्या आमदार असून त्या आधी स्व. आर. आर. पाटील हे या मतदारसंघाचं नेतृत्व करायचे.

दरम्यान, यावेळी बोलतांना पवारांनी आर आर पाटील यांच्या आठवणीनांही उजाळा दिला. ते म्हणाले, माझी निवड 100 टक्के खरी ठरली आणि आर. आर पाटील यांनी ग्रामविकासमध्ये चांगलं काम केलं. त्यानंतर त्यांच्याकडे गृहखातं दिलं. आता ते निघून गेले. पण रोहित याची कमतरता भरून काढेल, असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला.
.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles