Thursday, July 25, 2024

Tata Nexon च्या विक्रमी विक्रीचा उत्सव…मिळणार 1 लाखांचा डिस्काउंट

Tata Nexonनगर (प्रतिनिधी)- भारतातील आघाडीची ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने लॉन्च केलेल्या नेक्सॉनची 7 वर्षात 7 लाख वाहन विक्रीचा विक्रमी टप्पा गाठला असून, देशातील नंबर एकची एसयूव्ही कारचा बहुमान मिळवला असताना देशभर टाटा मोटर्सच्या शोरुममध्ये उत्सव सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर एमआयडीसी नगर-मनमाड रोड येथील कामू मोटर्स (मॅक्स मोटर्स) टाटा शोरुमध्ये हा उत्सव साजरा करुन ग्राहकांसाठी 1 लाख रुपया पर्यंतचा डिस्काऊंट ऑफर जाहीर करण्यात आला.
या उत्सव सोहळ्याप्रसंगी रॉयल एनफिल्ड चे रीजनल राईड कॉर्डिनेटर (महाराष्ट्र) आसिफ खान, शोरूमचे संचालक सागर कराचीवाला, निखिल कराचीवाला, विशाल कराचीवाला, सेल्स मॅनेजर मुदस्सर शेख आदींसह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2017 मध्ये लॉन्च झालेल्या नेक्सॉनने 2021 ते 2023 अशी सलग तीन वर्षे भारतातील सर्वात जास्त विक्री होणारी एसयूव्ही कार ठरली आहे.
2017 मध्ये लॉन्च झाल्यापासून, नेक्सॉनने डिझाइन, सुरक्षितता, आराम आणि ड्रायव्हिंगचा आनंद यामध्ये नवीन मानके स्थापित केली आहेत. गेल्या सात वर्षांत, त्याच्या वाढत्या ग्राहकांच्या अतुलनीय समर्थनामुळे आणि प्रेमाने नेक्सॉनला उद्योगातील एक प्रतिष्ठित ब्रॅण्ड बनवले असल्याचे शोरुमच्या वतीने सांगण्यात आले आहे.
कामू मोटर्स (मॅक्स मोटर्स) टाटा मोटर्स मधे नेक्सोन हि वाहन वर नगर, शिर्डी, संगमनेर, येवला, नाशिक, सिन्नर येथील शोरुममध्ये 15 ते 30 जून पर्यंत एक लाख रुपये पर्यंत डिस्काउंट ग्राहकांना दिला जाणार आहे. यासाठी ग्राहकांना त्वरीत बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Ola ने आपली इलेक्ट्रिक स्कूटर S1 केली अपडेट…स्कूटर चालतांना आपोआप रिचार्ज

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles