हिवाळा सुरू होताच शाळेमध्ये विविध ॲक्टिवीटी सुरू होतात. स्पोर्ट्स आणि डान्सची स्पर्धा याच दिवसांत होते. तुम्ही देखील शाळेत डान्समध्ये अनेकदा सहभाग घेतला असेल. अशात सोशल मीडियावर एका मॅडमच्या डान्सचा जबरदस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे.शाळेत डान्स स्पर्धा सुरू असताना सर्वच शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना डान्सच्या विविध स्टेप्स शिकवतात. आता देखील या मॅडमने दम दम मस्त है या बॉलिवूड गाण्यावर आपल्या विद्यार्थ्यांना सुंदर स्टेप्स शिकवल्यात. यावेळी त्यांनी एक सिंपल साडी परिधान केली आहे.
या मॅडमसोबत शाळेतली एक विद्यार्थिनी देखील डान्स करतेय. तर बाकीचे विद्यार्थी त्यांच्या भोवती घोळका करून उभे आहेत. हा डान्स फक्त मुलींचा असावा असं व्हिडीओ पाहून वाटत आहे. कारण मॅडम आणि विद्यार्थिनीच्या मागे काही मुली एका पोजमध्ये उभ्या आहेत. @mini.26 या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.
Video: विद्यार्थ्यांसमोर मॅडमचा दम दम मस्त है या गाण्यावर जबरदस्त डान्स
- Advertisement -