नगर : राज्यात एकूण १५६ व्यवस्थापनांकडून तब्बल सात हजार ७२० शिक्षकांच्या पदांची जाहिरात शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलवर दिली आहे. या शिक्षक पदांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असणाऱ्या आणि पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. बहुप्रतीक्षेत असणाऱ्या शिक्षक भरतीतील किमान काही जागांची जाहिरात निघाल्याने शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. शिक्षक भारती ने वेळोवेळी पाठपुरा केल्यामुळे हे यश मिळाले असल्याचे शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्यसचिव सुनील गाडगे यांनी सांगितले.
शिक्षक भारतीच्या वतीने आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक नेते तथा राज्य सचिव सुनील गाडगे यांनी राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या भरतीची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी अशी मागणी केली त्यामुळे शिक्षकांना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.
‘अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी २०२२’ या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी पवित्र प्रणालीमध्ये वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेल्या उमेदवारांना जाहिरातीनुसार ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. संबंधित पात्र उमेदवारांना पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. महानगरपालिका यांच्यासह १२५ खासगी व्यवस्थापन अशा एकूण १५६ व्यवस्थापनाकडून सात हजार ७२० शिक्षकपदाची जाहिरात देण्यात आली आहे. या व्यवस्थापनांकडून पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. यात मराठी माध्यमाच्या शाळांसाठी सहा हजार ८४५ शिक्षकांच्या पदांच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. असे राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी सांगितले.
या मागणीसाठी शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे . जिल्हा सचिव महेश पाडेकर., संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी . हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख. संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे . रेवण घंगाळे जॉन सोनवणे .महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींना विशेष परिश्रम घेतले.
राज्यात तब्बल 7 हजार 720 शिक्षकांच्या पदांची जाहिरात…
- Advertisement -