Tuesday, June 25, 2024

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ४ टक्के वाढीव महागाई भत्ता तात्काळ मिळावा

शिक्षकांना ४ टक्के वाढीव महागाई भत्ता तात्काळ मिळावा; शिक्षक भारतीची मागणी – सुनील गाडगे

नगर- शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी २०२४ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करुन ४ टक्के महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्याबाबत निवेदन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्यसचिव सुनील गाडगे यांनी दिले.
केंद्र शासनाने केंद्रिय शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक १ जानेवारी २०२४ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता लागू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
केंद्र शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुध्दा दिनांक १ जानेवारी २०२४ पासून ४ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात यावा आणि वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी मिळणे बाबत आदेश तत्काळ निर्गमित करावेत, अशी मागणी शिक्षक भरती संघटनेच्या वतीने शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे,जिल्हा सचिव महेश पाडेकर., संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे, रेवण घंगाळे जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींना दिला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles