Tecno Phantom V Flip १ ऑक्टोबरपासून सेलसाठी उपलब्ध होईल. हा सध्या बाजारातील सर्वात स्वस्त फ्लिप फोन आहे. टेक्नोच्या ह्या फोनमध्ये तुम्हाला शानदार LTPO डिस्प्ले आणि ६४ मेगापिक्सलच्या कॅमेरासह पावरफुल प्रोसेसर मिळेल.
Tecno Phantom V Flip चा एकच मॉडेल भारतात आला आहे. ज्यात ८जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ह्या हँडसेटची किंमत कंपनीनं ४९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. आयकॉनिक ब्लॅक आणि मिस्टिक डॉन कलर ऑप्शनमध्ये येणारा हा फोन तुम्ही अॅमेझॉन इंडियावरून खरेदी करू शकता.