तेजश्री प्रधान मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेतील तेजश्री आणि शशांक केतकरच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. ऑनस्क्रीनबरोबर खऱ्या आयुष्यातही दोघांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली. पण, काही काळातच दोघे वेगळे झाले. घटस्फोटाच्या नऊ वर्षांनंतर तेजश्रीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.मध्यंतरीच्या पडत्या कळानंतर तेजश्रीने मनोरंजन क्षेत्रात पुन्हा कमबॅक केलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तेजश्रीने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एवढंच नाही, तर नवऱ्यामध्ये कोणते गुण हवेत याबाबतचा खुलासाही तेजश्रीने केला आहे. तेजश्री म्हणाली, “लग्नासाठी मला फार स्थळं येत नाहीत. मला कुटुंब आवडतं. मला कुटुंब हवं आहे. मला लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे ही गोष्ट माझ्या एवढी डोक्यात होती की, वयाच्या २४-२५ व्या वर्षी मी तो निर्णय घेतला. पण, मला आता माझ्या आयुष्यात सेट व्हायचं आहे. त्यामुळे योग्य स्थळ आणि जबाबदार मुलगा मिळाला की लगेच मी लग्न करण्याचा निर्णय घेईन. लग्न या शब्दाचा आदर करणारा, जबाबदार, शांत, माझी बडबड ऐकणारा मुलगा मला हवा आहे.
- Advertisement -