Saturday, December 9, 2023

आ.प्रा.राम शिंदें पोहोचले तेलंगाणात….विधानसभेसाठी मोठी जबाबदारी…

आ.प्रा.राम शिंदें यांच्यावर तेलंगणा

राज्यातील मतदार संघाची जबाबदारी

नगर – प्रतिष्ठेची समजली जाणार्‍या तेलंगना विधान सभा निवडणुक अंतिम टप्प्यात आली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर या राज्यातील विविध मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार राम शिंदे यांच्यावरही तेलंगनातील महत्वाच्या जगतीयाल जिल्ह्यातील मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या मतदार संघात आ.राम शिंदे यांनी नुकतीच कोअर कमिटी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी, मंडल अध्यक्ष, सचिव, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, विविध मोर्चाचे अध्यक्ष यांच्याह सोशल मिडिया प्रमुखांची कार्याशाळा घेतली. याप्रसंगी निजामाबादचे खासदार अरविंद धर्मपुरी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सत्यनारायण राव, विधानसभा निमंत्रक मदन मोहन, प्रदेश कार्यकारीणी सदस्य श्रावणी बोगा, जिल्हा सरचिटणीस रंगीला सत्यनारायण आदि उपस्थित होते.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या टिममध्ये आ.राम शिंदे यांचा समवेश असल्याने नेहमीच त्यांच्यावर विविध राज्यातील निवडणुकीची जबाबदारी देण्यात येते. यापुर्वीही गोवा, कर्नाटक राज्यातील निवडणुकांची जबाबदारीही देण्यात आली होती. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे 9 वे वंशज म्हणून देशभर आ.राम शिंदे यांना देशातील विविध भागात मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्यावर नेहमीच अशाप्रकारे जबाबदारी टाकण्यात येत असते. पक्षांतर्गत आ.प्रा.राम शिंदे यांचे महत्व वाढत असल्याने त्यांच्यावर केंद्रीय पातळीवर वेगवेगळ्या जबाबदार्‍या देण्यात येत आहे.

या कार्यशाळेत केंद्र सरकारच्या योजनांची होत असलेली अंमलबजावणी, योजनांचा लाभ मिळालेल्यांच्या प्रतिक्रिया, भाजपा पक्षाची तेथील स्थिती बाबत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करुन पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आ.राम शिंदे यांनी केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles

%d