Saturday, December 7, 2024

पर्यटन मंत्री तलावात उतरले…बाहेर पडताना गाळात अडकले…प्रचंड धडपड…व्हिडिओ

गालँडचे पर्यटन आणि उच्च शिक्षण मंत्री नागालॅंडचे मंत्री तेमजेन इम्ना इंटरनेटवर नेहमी चर्चेत असतात. सोशल मिडियावर प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्तींपैकी ते एक आहेत. सोशल मीडियावर ते रोज काही ना काही मनोरंजक आणि मजेदार पोस्ट्स करत असता असतात ज्यामुळे ते नेहमी चर्चेक असतात. सध्या त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. तेमेजेन तलावात उतरले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे पण सहजासहजी त्यांना बाहेर पडता येत नाही. तेमेजेन यांनी स्वत:च हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हिडीओमध्ये दिसते आहे की तलावा उतरलेल्या तेमजेन यांना पाण्यातून बाहेर येता नाही. चक्क तीन लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले जात असल्याचे दिसत आहे. गंमत म्हणजे त्यांना मदत करूनही त्यांना बाहेर येण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. अखेर कसेतरी ते तलावाच्या बाहेर पडतात आणि तलावाच्या किनारी खुर्चीवर बसतात.

लोकांना वाहनाची सुरक्षा मानके जाणून घेण्यासाठी कार खरेदी करण्यापूर्वी त्याचे NCAP (न्यू कार असेसमेंट प्रोग्राम) रेटिंग तपासण्याचा सल्ला देण्यासाठी त्यांनी ही मनोरंजक पोस्ट शेअर केली आहे. इम्ना यांनी या पोस्टसोबत कॅप्शन लिहिले, ‘आज जेसीबीची चाचणी होती! टीप: हे सर्व NCAP रेटिंगबद्दल आहे, कार खरेदी करण्यापूर्वी NCAP रेटिंग तपासा. कारण ती तुमच्या आयुष्याची बाब आहे!!’

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles