नगर-घर मालकासह तिघांनी भाडेकरू महिलेसोबत गैरवर्तन केल्याची घटना रविवारी (दि. 17) सायंकाळी रेल्वेस्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संजू शिंदे व त्याच्या सोबतचे दोन अनोळखी यांच्याविरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गेल्या दोन महिन्यांपासून शिंदे याच्याकडे भाडोत्री राहतात. त्यांचे पती रविवारी सकाळी कामावर गेले होते. त्या सायंकाळी पाचच्या सुमारास दोन मुलांसह घरात असताना शिंदे हा दोन अनोळखी व्यक्तींना घेऊन तेथे आला. त्याने फिर्यादी सोबत गैरवर्तन करण्यास सुरूवात केेली. सोबतच्या व्यक्तीने मुलाला बाजूला ढकलून दिले. दरम्यान, फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता ते तिघे पळून गेले. फिर्यादीने पतीला फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पती घरी आल्यानंतर त्यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे.