Sunday, July 14, 2024

नगर अरणगाव परिसरात ट्रक – कंटेनर व स्विफ्ट तीन वाहनांचा भीषण अपघात तीन ठार… व्हिडिओ

अहमदनगर -बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव परिसरात शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्रक-कटेंनर व स्विफ्ट या तीन वाहनांचा भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच अरणगाव ग्रामस्थांसह नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

शनिवारी सकाळी बाह्यवळण रस्त्यावर अरणगाव परिसरात ट्रक व कंटेनरचा अपघात झाला. तसेच पाठीमागून स्विफ्ट कार जोरात धडकली. यात तीघांचा मृत्यू झाला. याच ठिकाणी गेल्या आठ दिवसांपूर्वी दोन वाहनांचा अपघात झाला होता. त्यात दोन जण जखमी झाले होते.

त्यानंतर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन केले होते. साईड पट्या, सर्व्हिस रोड, दिशादर्शक फलक लावण्याच्या आश्‍वासनानंतर कार्ले यांनी आंदोलन मागे घेतले होते. आज झालेल्या अपघातील मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अपघातामुळे वाहनांच्या लांबपर्यंत रांगा लागल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व एनएचआयकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles