Home नगर जिल्हा जामखेड शिवारात एसटी बस व कारचा भिषण अपघात, मयत नगर तालुक्यातील तरुण

जामखेड शिवारात एसटी बस व कारचा भिषण अपघात, मयत नगर तालुक्यातील तरुण

0

जामखेड शिवारात एसटी बस व कारचा भिषण अपघात, वडगाव गुप्ता येथील तीन तरुणाचा मृत्यू तर दोन जण जखमी

जामखेड शहरापासून काही अंतरावर असलेल्या खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात काल रात्री एसटी बस व शेरोलेट बीट या कारचा भिषण आपघात होऊन तिन जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्या तिन जणांपैकी दोन जण जागीच जागीच ठार तर एकाचा दवाखान्यात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला असून या घटनेने संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातात विजय गंगाधर गव्हाणे, (वय 24 वर्षे), पंकज सुरेश तांबे, (वय 24 वर्षे), मयूर संतोष कोळी, (वय 18 वर्षे) अशी मृत्यू पावलेल्या तरूणांची नावे असून सचिन दिलीप गीते, (वय 30) अमोल बबन डोंगरे, (वय 28) हे दोघे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठवण्यात आल्याची माहिती जामखेड पोलीसांकडून देण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड पोलीस ठाणे हद्दीतील जामखेड खर्डा रोडवर बटेवाडी शिवारात, कोल्हे पेट्रोल पंप जवळ जामखेडकडून खर्डाकडे जाणारी कोपरगाव आगाराची कोपरगाव ते हैदराबाद जाणारी एसटी बस क्रमांक MH 09 FL 1027 हे (चालक सचिन विष्णू राऊत, वय 38 वर्षे, बॅच न 8551,) या बसचा आणि खर्डा कडून जामखेड कडे येणारी शेरोलेट बीट कार क्रमांक MH 16 AT 6492 या वाहनांचा भिषण अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता की .या अपघात कार मधील पाच जणांपैकी दोन जण जागीच ठार तर एकाच दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.
दरम्यान अपघातातील तीन गंभीर जखमींना शहरातील पन्हाळकर हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार करून नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल ला पाठविलेले होते. हे तिन्ही गंभीर जखमींचा मृत्यू झाले आहेत.
अपघातातील मयत १)विजय गंगाधर गव्हाणे, वय २४ वर्षे, २) पंकज सुरेश तांबे, वय २४वर्षे ३) मयूर संतोष कोळी, वय १८ वर्षे
तर ४) सचिन दिलीप गीते, वय ३०, ५) अमोल बबन डोंगरे, वय २८ या अपघातातील सर्व तरूण नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता, MIDC, नगर येथील रहिवासी आहेत. जखमींवर समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे पाठविण्यात आले आहे. सदर अपघातील बसचालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग श्री वाखारे, जामखेड पोलीस निरीक्षक महेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांनी भेट दिली आहे. या घटनेचा पुढील तपास जामखेड पोलीस करत आहेत.