अहमदनगर- आलमगीर परिसरात कोयता घेऊन दहशत करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे.धारदार कोयता बाळगून परिसरात दहशत करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई करण्यात आली.भिंगार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश राजगुरू यांना आलमगीर परिसरात एक इसम हातात धारदार कोयता बाळगून दहशत करीत असल्याची माहिती मिळाली होती.त्यानुसार आधी पोलिसांनी खात्रीकेली.
भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या पथकाने खात्री करून कारवाई केली.सदर इसमाची अंगझडती घेतली असता कंबरेला धारदार कोयता असल्याचे दिसून आले.शाहरुख मेहमूद बेलदार (वय २८, रा. अमिना नगर, ब्रहातळे रोड आलमगीर, ता.नगर) याला अटक केली. ही कारवाई योगेश राजगुरू यांच्या पथकाने केली.
अहमदनगरमध्ये कोयता घेऊन दहशत, पोलीसांनी एकाला केली अटक
- Advertisement -