महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी गुढीपाडवा मेळाव्यात महत्त्वाची घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे महायुतीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.महायुतीने राज ठाकरे यांचा पाठिंबा घेतल्याने ठाण्यातील भाजपचे उत्तर भारतीय पदाधिकारी संतापले आहेत. राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळात परप्रांतीयांविरोधात जोरदार आघाडी घेतली होती. मनसेच्या या आंदोलनावेळी बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या नागरिकांना मनसैनिकांनी चोप दिला होता. त्यामुळे राज ठाकरे यांची अँटी-उत्तर भारतीय इमेज तयार झाली होती. त्याची सल अजूनही उत्तर भारतीय समाजाच्या मनात आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते.
या नाराज पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा पाठिंबा घेणाऱ्या भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे.