मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला गुरुवारी ठाण्यापासून सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांची ठाण्यात सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना उघडपणे इशारा दिला आहे. “आम्हाला बोलायला लावू नका. बोलायला लागलो तर पळता भुई थोडी होईल. आमच्याकडे बरंच काही बोलायला आहे. आम्ही ते सर्व अजून सांभाळून ठेवलं आहे”, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
सत्तेची डोक्यात हवा गेली की लोकंदेखील बरोबर लक्षात ठेवतात. म्हणून आपला जन्म सत्तेसाठी झालेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी कितीतरी वेळा सत्तेला लात मारली आहे. पण दुसरीकडे सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायदडी तुडवले. सत्तेसाठी बाळासाहेबांनी ज्यांना कायमचं दूर केलं त्यांना तुम्ही जवळ केलं”, असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवर केला.