संपूर्ण राज्यचे लक्ष लागून असलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला वर्चस्व सिद्ध केले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी आघाडी घेतली आहे तर विद्यमान खासदार राजन विचारे हे पिछाडीवर पडले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नरेश म्हस्के यांना 1 लाख 18 हजार 179 मतांची आघाडी आहे. शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत थेट लढत होत असल्याने ही लढत प्रतिष्ठेची मानली जात होती.
मात्र समोर आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार ठाणे लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यात वर्चस्व सिद्ध करत ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.