Saturday, May 18, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१२ पासूनच शिवसेना फोडायची तयारी करीत होते…

शिवसेना फोडायची होती असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी केलं आहे. ठाण्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारसभेत त्यांनी हा आरोप केला आहे.

पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव पुढे येण्याधी लालकृष्ण आडवाणी हे नावच चर्चेत होतं. मात्र तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी हे सांगितलं की लालकृष्ण आडवाणी नसतील तर आमचा पाठिंबा सुषमा स्वराज यांना आहे. ही भूमिका घेतल्याने नरेंद्र मोदींना हे लक्षात आलं की बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे काही आपल्या बाजूने नाहीत. मग नरेंद्र मोदींनी हे ठरवलं की आपण ठाकरेंना धडा शिकवायचा हे ठरवलं होतं. २०१२ मध्ये त्यांनी धडा शिकवण्यास सुरुवात केली. २०१२ पासूनच त्यांना शिवसेना फोडायची होती. २०१९ मध्ये मोदींनी ते करुन दाखवलं. शिवसेनेला संपवण्याचा त्यांचा निर्धार २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतरच झाला होता. हे सगळं आपल्याला म्हणजे सामान्य जनतेला समजायला उशीर झाला. २०१४ मध्ये शिवसेनेच्या, काँग्रेसच्या सगळ्या मतदारांनी वेगळं मतदान केलं असंही कुमार केतकर यांनी म्हटलं आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles