Tuesday, September 17, 2024

लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा, महिलांनी मानले आ.जगताप यांचे आभार…व्हिडिओ

लाडक्या बहिणींच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी केला आनंदोत्सव साजरा महिलांनी मानले आमदार संग्राम जगताप यांचे आभार

अहमदनगर – महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने पोस्ट ऑफिस समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने महिलांनी पेढे वाटून, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, नगर शहरात अर्ज भरण्याची प्रक्रिया प्रभाग निहाय राबवत आमदार संग्राम जगताप यांनी लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल महिलांनी आमदार जगताप यांची आभार मानले.
यावेळी लाडकी बहिण योजना समितीचे सदस्य तथा माजी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, प्रकाश भागानगरे, वरिष्ठ पोस्ट मास्तर अश्विनी फुलकर, स्मिता कुलांगे, साधना बोरुडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

राज्यात महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. तसेच दर महिन्याला प्रत्येकी दीड हजार रुपये देण्याचे आश्वासन देत जुलै महिन्याचा पहिला व ऑगस्ट महिन्याचा दुसरा हप्ता रक्षाबंधनला देण्याचा वादा केला होता. त्यानुसार सरकारने रक्षाबंधन पूर्वीच लाडक्या बहिनींना मोठे गिफ्ट दिले आहे. लाडकी बहिण योजनेचे खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण असून या सर्वसामान्य महिलांना मोठा हातभार मिळाला आहे.
गेल्या दोन महिन्यापूर्वी लाडकी बहिण योजनेचे सरकारने घोषणा करत अर्ज प्रक्रिया राबविली. सुरुवातीला विविध कागदपत्रांमुळे महिलांनी बँक, सेतू केंद्र, तलाठी कार्यालय, तहसिल कार्यालयासमोर रांगा लावल्या होत्या. दरम्यान जाचक अटी शिथिल करत सुलभ अर्ज प्रक्रिया राबविली. त्यामुळे महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. नगरमध्ये महिलांच्या सोयीसाठी आमदार संग्राम जगताप यांचे संपर्क कार्यालय येथे लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरणा केंद्र सुरु केले. येथे महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत योजनेचे अर्ज दाखल केले. स्वतः आमदार जगताप यांनी महिलांचे अर्ज भरुन घेतले. तसेच नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामार्फत प्रभाग निहाय अर्ज भरण्यासाठी महिलांना मदत केली. कागदपत्रे काढण्यासाठी मदत केली.

लाडक्या बहिणींनी मानले संग्रामभैय्यांचे आभार
महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली. सुरुवातीला लाडकी बहिण योजनेचे प्रक्रिया किचकट होती. परंतु, आमदार संग्राम जगताप यांनी व त्यांच्या सहकार्यांनी प्रभाग निहाय महिलांना सहकार्य करत लाडकी बहिण योजनेचे अर्ज दाखल केले. तसेच अर्ज भरण्यासाठी येणार्‍या अडचणींची सोडवणूक करुन स्वत. आमदार संग्राम जगताप यांनी शहरातील महिलांची अर्ज मोठ्या प्रमाणात भरले. सरकार व आमदार जगताप यांच्यामुळेच आम्हाला आमच्या खात्यावर लाडकी बहिण योजनेचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. लाडकी बहिण योजनेची प्रक्रिया सुलभ करुन अर्ज भरुन घेतले त्याबद्दल आम्ही आमदार संग्राम जगताप यांचे आभारी आहोत असे महिलांनी यावेळी सांगितले.


महिलांचा सरकारवरील विश्वास वाढला
महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना आणून दर महिन्याला दीड हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. परंतु, विरोधकांकडून निवडणुकीच्या तोंडावर योजना आणल्याचे सांगत पैसे मिळतील की नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात होत्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर दौरा करत लाडक्या बहिणींना रक्षाबंधनला पहिले दोन हप्ते मिळतील असे आश्वासन दिले होते. रक्षाबंधनच्या अगोदरच महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह महायुती सरकारवतील महिलांचा विश्वास वाढला आहे

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles