शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पावर गटासोबत भाजपने युती केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यामागचं कारण स्पष्ट केलं आहे. शिवसेनेशी भावनिक तर राष्ट्रवादी काँग्रेसशी धोरणात्मक युती असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांनी संपत्तीचे प्रदर्शन न करता साधेपणाने राहण्याच्या सूचना शनिवारी प्रदेश पदाधिकारी व नेत्यांना दिल्या आहेत.
महायुतीमध्ये राज्यात अनेक ठिकाणी वाद होत आहेत. विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महायुतीबरोबर घेण्याचा निर्णय अनेक भागांत नेते व कार्यकर्त्यांना पसंत पडलेला नाही. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी शिवसेनेशी भावनात्मक तर राष्ट्रवादी काँग्रेसशी धोरणात्मक युती असल्याचे स्पष्ट केले.