बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेणाऱ्या आरोपीस नगर तालुक्यात पोलिसांनी 24 तासाच्या आत केले अटक
नगर दि. 22 मार्च :- सविस्तर नगर तालुका येथील वाळकी येथील फिर्यादी यांच्या अल्पवयीन मावस बहिण पीडित मुलगी हिचे इयत्ता 12 मधे कोयाळपिंपळा ता. आष्टी जि.बीड येथे बाहेरुन शिक्षण चालु होते. तिची 12 वी. बोर्डाची परीक्षा परीक्षा असल्याने तिचे परीक्षा केंद्र रुईनालकोल ता. आष्टी जि.बीड येथे आल्याने व सदर मुलीला परीक्षेला जाणे येण्याची सोय नसल्याने फिर्यादीचे वडील हे मुलीला पेपरला सोडण्याचे व आणण्याचे काम करत होते.
सदर मुलीचा दि. 15/03/2024 रोजी शेवटचा पेपर झाला तेव्हा पासुन ती फिर्यादी यांच्या वाळकी येथे घरी राहत होती. यातील आरोपी याने सदर अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून सायंकाळी पळवून नेले आहे अशी फिर्याद फिर्यादीने दिनांक 21/03/2024 रोजी दाखल केली होती.
सदर घटना घडल्यानंतर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद गीते यांना तपासा संदर्भात मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या त्यादृष्टीने तपास करत असताना नगर तालुका पोलिसांच्या पथकाने अहमदनगर दक्षिण विभागाचे मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुडू,पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांची तपास कामी तांत्रिक मदत घेऊन सदर गावातील सीसीटीव्ही व सीडीआर तपास करून आरोपीच्या ठाव ठिकाणा तपासात निष्पन्न झाला होता त्या दृष्टीने पथक हे वाळकी शिवारामध्ये शोध मोहीम राबवून वाळकी ह्याच परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना परिसरातून ताब्यात घेऊन आरोपी
1) सोहेल तवकल शेख रा. वाळकी जि.अहमदनगर याला अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीस आज कोर्टात हजर करण्यात येणार
व त्याला पळून नेण्यास इतर कोणी मदत केली होती का याचा तपास पोलीस करत आहेत तपासात त्यादृष्टीने निष्पन्न झाल्यास त्यांना सुद्धा अटक करण्यात येणार आहे अशी माहिती नगर तालुका पोलिसांनी दिली. सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ग्रामीणचे उपविभागी पोलीस अधिकारी संपतराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते,पोलीस उपनिरीक्षक रणजीत मारग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनकर घोरपडे,पोलीस हेड कॉन्स्टेबल रायचंद पालवे, पोलीस नाईक अझरुद्दीन सय्यद,चालक विकास शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल टकले यांनी कारवाई केली.