Saturday, October 12, 2024

मुलीने पळून जाऊन केले लग्न मात्र घरच्यांनी घातला दुसऱ्या लग्नाचा घाट अन घडले असे काही…

अहमदनगर -मुलीने पळून जाऊन लग्न केले मात्र घरच्यांना ते मान्य नसल्याने त्यांनी तिचे गावातील जवळच्या पाहुण्याच्या मुलाशी लग्न लावण्याचे ठरले मात्र ही बाब त्या मुलीच्या प्रियकरला समजताच त्याने थेट ते गाव गाठले. यावेळी चांगलाच राडा झाला. ही घटना श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी , तालुक्याच्या पश्चिमेला असलेस्या एका गावातील मुलीचे गावातील एकाशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून त्यांनी ऑगस्ट महिन्यात पळून जाऊन विवाह केला. मुलींच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तक्रार दाखल केल्यावर काही दिवसांनी मुलीचा शोध लागला. मात्र तिच्या आई-वडिलांना तिचा झालेला विवाह मान्य नव्हत. त्यामुळे त्यांनी तिची समजूत काढून घर परत आणले आणि गावातील जवळच्या पाहुण्याच्या मुलाशी तिचे लग्न ठरवले.

ही माहिती पळवून नेणाऱ्या मुलाला समजली. त्याने नगरवरून थेट मुलीचे गाव गाठले. येताना बॉडीगार्ड बाऊनसर तसेच गौण खनिज उत्खनन करणारा एक मित्र आणि त्याचसोबत अनेक माणसे आणली.तो मुलीच्या घरी गेला व म म्हणाला माझी पत्नी माझ्या स्वाधीन करा. मात्र तिच्या पालकांनी त्यास नकार दिला. यावरून त्यांच्यात तुफान मारामारी झाली. आलेल्या जवळपास सर्वांनाच मारहाण करण्यात आली तसेच त्यांनी सोबत आणलेल्या गाड्याही फोडण्यात आल्या. त्यामुळे जीव मुठीत सर्वजण तेथून पळून गेले.पोलिसांना एका नागरिकाने आपत्कालीन सेवेतील ११२ क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती देणाराने गोळीबार झाल्याचेसांगितले. पोलीस निरीक्षक किरण शिंदे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी घटनास्थळी बुलेटकॅपचा सखोल शोध घेतला. मात्र त्यांना कुठेही बुलेटकॅप मिळून आली नाही. त्यामुळे पोलिसांच्या हा बनाव असल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी मुलीसह मुलाच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र सर्वजण माहिती देण्याचे टाळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी त्यांना श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास सांगितले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही तक्रार त्यांनी दाखल केली नाही.

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र घटनास्थळी मुलीच्या कारणातून मोठ्या प्रमाणात वादावादी होऊन चार चाकी गाड्यांची तोडफोड झाली असून ही घटना मोठी आहे असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी गोळीबार झाल्याचा बनाव केल्याचे निदर्शनात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles