Tuesday, February 18, 2025

नगर जिल्ह्यात खळबळ…. दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका जोडप्याचे मृतदेह आढळले

अहमदनगर-दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका जोडप्याचे मृतदेह तालुक्यातील आदिवासी भागातील खिरविरे येथील आंबेविहीर येथील एका विहिरीत संशयास्पदरित्या आढळून आले आहेत. बहिरू काळू डगळे (वय 25) व सारिका बहिरू डगळे (वय 22) असे या नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. ही हत्या की आत्महत्या? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. यामुळे खिरविरे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, डगळे दाम्पत्य हे 30 जून रोजी रात्री घरी कुणाला काहीही न सांगता निघून गेले होते. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता ते कुठेही सापडले नाही.

अखेर काल गुरूवारी दुपारी खिरविरे येथील आंबेविहीर येथील एका विहिरीत पाण्यात त्यांचे मृतदेह तरंगताना दिसल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरात सुरू असलेल्या कलहामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती समजताच अकोले पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भूषण हांडोरे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्हीही मृतदेह गावकर्‍यांच्या मदतीने विहिरीतून बाहेर काढले असता चार दिवसांपासून ते पाण्यात असल्याने मोठी दुर्गंधी निर्माण झाली होती.

हे मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात आणले आहे. सदर मृतदेह हे एका कापडाने बांधलेले असल्याने ही हत्या की आत्महत्या याबाबत उलट-सुलट चर्चा होत आहे. दरम्यान मयत बहिरू डगळे याचे मामा एकनाथ रामभाऊ कुलाळ यांनी आपला भाचा व भाचे सून यांनी आत्महत्या केली नसून ती हत्याच आहे. प्रॉपर्टीच्या वादामुळे त्यांचा खून केल्याचा दावा त्यांनी केला आहे.पोलिसांनी त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली आहेत. शवविच्छेदन अहवाल नंतरच ही हत्या की आत्महत्या हे समजू शकणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles