Tuesday, June 25, 2024

पारनेर तालुक्यातील मांडओहोळ जलाशयात नगर शहरातील दोन तरुणांचा मृतदेह आढळला

पारनेर तालुक्यातील मांडओहोळ जलाशयात रविवारी (दि. १९) दुपारी दोन तरुण बुडाले. दोघांपैकी एकाचा मृतदेह पाण्यातून रविवारी संध्याकाळी बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले होते. तर दुसऱ्या मृतदेहाचा शोध सायंकाळपर्यंत सुरू होता. अखेर आज सोमवार दि. २० रोजी सकाळी नऊच्या दरम्यान दुसरा मृतदेह ही सापडला आहे. शहरातील नगर-कल्याण रस्ता परिसरातील शिवाजीनगर भागातील सहा मुले दुचाकीवरून मांडओहोळ जलाशयात फिरण्यासाठी गेले होते.
अथर्व श्रीनिवास श्रीराम (वय १८, रा. शिवाजीनगर, नगर-कल्याण रस्ता, अहमदनगर) सौरभ नरेश मच्छा (१८, रा. अहमदनगर) हे दोन मुले मांडओहोळ जलाशयात बुडाले. प्रशासनाच्या प्रयत्नाने दोन्हीही मृतदेह आता सापडले आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रविवारी दुपारी अथर्व श्रीनिवास श्रीराम वय १८ वर्ष (मयत), सौरभ नरेश मच्छा वय १८ वर्ष (मयत), (चैतन्य बालाजी सापा (वय १९, शिवाजीनगर, अहमदनगर), आकाश अनिल हुंदाडे (१८), जीवन दिनेश पाटील (रा. रेल्वे स्टेशन, आगरकर मळा, अहमदनगर), अभिलाष रघुनाथ सुरम (१८) हे सहा जण दुचाकीवरून निघोज येथून मांड ओहोळ जलाशयात पोहोचले. दुपारी तीन ते चारच्या दरम्यान अथर्व श्रीराम, सौरभ मच्छा पाण्यात पोहोण्यासाठी उतरले. पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्यात बुडाले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles