राहुरी शहर हद्दीतील राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदीपात्रात आज दि. 16 डिसेंबर रोजी दुपारच्या दरम्यान एका नग्न अवस्थेत असलेल्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. आज दि. 16 डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजे दरम्यान राहुरी शहर हद्दीत राहुरी व देसवंडी रस्त्यावर मुळा नदीपात्रात रस्त्यापासून सुमारे 100 फूट अंतरावर पानाडामध्ये मृतदेह आढळून आला. सदर मृतदेह हा नग्न अवस्थेत असून कुजलेल्या अवस्थेत आहे. सदर मृतदेह महिलेचा आहे कि, पुरुषाचा हे समजू शकले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, हवालदार संदिप ठाणगे, आजिनाथ पाखरे, अशोक शिंदे, प्रमोद ढाकणे, सचिन ताजणे, सतिष कुर्हाडे, अंकुश भोसले आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाची पाहणी केली. तसेच पुढील तपास सुरु केला. सदर मृतदेह कोणाचा, त्याची हत्या झाली कि आणखी काही, कोणत्या कारणाने हत्या झाली असावा ? अशा वेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. या घटनेतील मृतदेहाची ओळख पटविणे तसेच या गुन्ह्याचा तपास लावणे, हे पोलिस प्रशासनासमोर एक आव्हानच आहे.
सुमारे दोन महिन्या पूर्वी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरात अशाच प्रकारे एका अनोळखी तरुणाचा घातपात करुन आणून टाकलेला मृतदेह आढळून आला होता. त्या मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने त्या तपासाला खीळ बसली. काल पुन्हा एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.