Sunday, March 16, 2025

वडिलांनीच चाकूने सपासप वार करत मुलाचा निर्घृण खून, अहमदनगर जिल्ह्यातील घटना

अहमदनगर: जिल्ह्यातील एका गावात अंगावर काटा आणणार घटना घडली आहे. वडिलांनीच चाकूने सपासप वार करत मुलाचा निर्घृण खून केला आहे. केवळ शिवीगाळ करू नका, असे म्हटल्याने वडिलांना राग आला. त्यानंतर रागाच्या भरात त्यांनी हे कृत्य केले. ही घटना नेवासे तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे रात्री घडली आहे.

बापाने आपल्या पोटच्या मुलाचा खून केल्याची घटना घडली आहे. रवींद्र पुंड असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. भीमराज किसन पुंड असे आरोपी बापाचे नाव आहे. घटनेच्या दिवशी रात्री वडील आणि मुलगा हे घरात जेवण करत होते. त्यावेळी आरोपी वडील भीमराज किसन पुंड याने घरात मोठमोठ्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी मुलगा रवींद्र पुंड याने वडील भीमराज यांना शिवीगाळ करू नका, असे सांगितले.त्याचा राग मनात धरून समोरच असणाऱ्या हॉटेल कृष्णामधून चाकू घेऊन येत भीमराज पुंडने मुलगा रवींद्रवर चाकुने सपासप वार केले. यातच रवींद्र पुंडचा मृत्यू झाला. अशी फिर्याद मृताची पत्नी ज्योती रवींद्र पुंड यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार आरोपी भीमराज किसन पुंड याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने घटनास्थळी सोनई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी भीमराज पुंड याला ताब्यात घेतले. आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता त्याला दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles