Thursday, March 20, 2025

नाशिक शिक्षक मतदारसंघात ट्विस्ट; किशोर दराडे, संदीप गुळवे यांचा उमेदवारी अर्ज मागे

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिक शिक्षक मतदारसंघात मोठ्या राजकीय घडमोडी घडतांना पाहायला मिळत आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून या दिवशी नाशिक शिक्षक मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार किशोर भिकाजी दराडे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार किशोर दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार संदीप गुळवे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

तर महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर भिकाजी दराडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गोपाळराव गुळवे यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांचे नामसाधर्म्य असणारे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे किशोर दराडे यांनी अपक्ष अर्ज भरल्याने ८ जूनच्या दुपारी अडीच वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता.

त्यानंतर अपक्ष उमेदवार किशोर दराडे हे पोलीस सुरक्षेत कोपरगावकडे रवाना झाले होते. यानंतर अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी माघार घ्यावी यासाठी काही दिवसांपासून शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर दबाव टाकला जात होता. त्यानंतर अखेर अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

तर अपक्ष उमेदवार संदीप गुळवे या उमेदवाराने नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र प्रतिस्पर्धी उमेदवाराने संदीप गुळवे या उमेदवाराला राज्याबाहेर नेल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या तावडीतून संदीप गुळवे यांना सोडवून आणल्याचा दावा देखील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles