Sunday, July 13, 2025

नगर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक निलंबित, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काढले आदेश

जामखेड – तालूक्यातील वादग्रस्त शिक्षक विजय सुभाष जाधव प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहा ता. जामखेड येथे कार्यरत असलेल्या शिक्षकाला जिल्हा परिषद चे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अखेर जिल्हा परिषद सेवेतून निलंबित केले आहे

याबाबतची सविस्तर माहीती अशी की , विजय सुभाष जाधव प्राथमिक शिक्षक मोहा ता. जामखेड येथे कार्यरत असताना सन २०२३ -२४ चे वार्षिक तपासणी वेळी तपासणी असलेल्या विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांना धमकावणे, दमबाजी करणे , याबाबतचा अहवाल जिल्हा परिषदेस प्राप्त झाला होता.
त्यामुळे जाधव यांनी जिल्हा सेवा (वर्तणूक ) नियम १९६७ मधील ३ चा भंग केल्याप्रकरणी त्यांना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबनकाळात त्यांना गटशिक्षणाधिकारी कार्यालय पंचायत समिती नेवासा हे मुख्यालय देण्यात आले आहे .
यापूर्वीच सुभाष जाधव यांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांची विभागीय चौकशी प्रास्तावित करण्यात आली आहे .

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles