राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारचा हा निर्णय फसवा असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, अशी मागणी देखील जरांगेंनी केली आहे.या मागणीसाठी आज (२४ फेब्रुवारी) राज्यातील गावागावात रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागलंय. जालन्यात मराठा आंदोलकांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाली.
यावेळी पोलिसांनी २५ मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं. दुसरीकडे नांदेडमधील एका तरुणाने राज्य सरकारचा निधेष करत भररस्त्यात पेट्रोल टाकून आपली नवीकोरी दुचाकी जाळून टाकली. या थरारक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.