सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहिल्यानंतर आपणाला हसू आवरता येत नाही, तर काही व्हिडिओ असे आहेत जे पाहून आपणाला आश्चर्याचा धक्का बसतो. शिवाय आजकाल लोक कुठेही फिरायला गेले की सेल्फी घेतात. शिवाय सेल्फीच्या नादात अनेकांना मोठ्या अपघातांचा सामना करावा लागल्याचे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक जोडपे पॅराग्लायडिंग करताना सेल्फी घेण्याचा प्रयत्न करते, ज्यामुळे त्यांचा मोठा अपघात होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून तो पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत, एक जोडपे पॅराग्लायडिंगचा आनंद घेत असल्याचं दिसत आहे. मात्र, यावेळी प्रियकर सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो आणि याचवेळी त्याच्या प्रेयसीचा सेफ्टी बेल्ट उघडतो, ज्यामुळे ती थेट पाण्यात पडते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला आहे. तर नेटकरी सेल्फीच्या नादात स्वत:चा जीव धोक्यात घालणं कधी बंद करणार असा प्रश्न विचारत आहेत.
— 1000 WAYS TO DIE (@1000waystod1e) October 17, 2023