Saturday, January 25, 2025

नगर अर्बन बँक घोटाळा ,माजी संचालकाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी संचालक अजय अमृतलाल बोरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

नगर : नगर अर्बन कोऑपरेटिव बँकेच्या घोटाळ्याप्रकरणांमध्ये बँकेचे माजी संचालक अजय बोरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांनी फेटाळून लावला आहे.

येथील नगर अर्बन कॉपरेटिव बँकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे सध्या बँकेचे लायसन हे रद्द करण्यात आलेले आहे. बँकेने कोट्यावधी रुपयांचे जे कर्ज दिले होते ते अद्याप पर्यंत वसून झालेले नाही, 291 कोटी रुपयांचा कर्जाचा घोटाळ्याचा विषय हा मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेला आहे .अर्बन बँकेच्या वेगवेगळ्या संदर्भातल्या गोष्टी या बाहेर आलेल्या आहे. चार पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. सुरुवातीला पोलिसांनी आणि नंतर आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने याचा तपास केलेला होता.

अटकपूर्व जामीनासाठी माजी संचालक अजय बोरा यांनी न्यायालय मध्ये अर्ज दाखल केलेला होता, त्या अर्जाला फिर्यादी राजेंद्र गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ विधीन्य अभिजीत पुप्पाल यांनी बँकेचा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे, या अगोदर ज्या संचालकांचा यामध्ये समावेश होता व त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहे .अजय बोरा हे सुद्धा बँकेचे माजी संचालक आहे. विशेष म्हणजे 291 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणासंदर्भामध्ये ज्या पद्धतीने बँकेच्या संचालक मंडळाने गांभीर्याने या बाबी लक्षात घेऊन वसुली करणे गरजेचे होते ती वसुली केली नाही ,म्हणून त्यांच्यावर लेखा परीक्षणामध्ये ताशोरे उडण्यात आलेले होते .एवढेच नाही तर आरबीआय ने सुद्धा त्यांच्यावर अशा प्रकारचे ताशोरे ओढले. यामध्ये अजय बोरा हे बँकेच्या ऑडिट रिकवरी या कमिटी मध्ये ते सदस्य म्हणून कार्यरत होते, त्यांनी सुद्धा या प्रकारे गांभीर्याने दखल घेतली नाही ,तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध हा केला नाही त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर आहे. ज्या वेळेला यांनी सर्व नियमांचे उल्लंघन केले म्हणून या बँकेचा परवाना आरबीआयने रद्द केलेला आहे ,त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांचे मोठ्या प्रमाणामध्ये व खातेदारांचे हाल झालेले आहे, याला हेच संचालक मंडळ जबाबदार असून यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावावा असा युक्तिवाद त्यांनी न्यायालयामध्ये केला होता.

न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अजय बोरा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles