बीड : आई व पत्नीची साथ मिळत नाही असे वॉट्सअप स्टेटस ठेऊन बेपत्ता झालेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचा बीडच्या सौताडा परिसरातील धबधब्याजवळ मृतदेह आढळून आला आहे. राजेंद्र गंडाळे असं मयत शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शिक्षक राजेंद्र गंडाळे हे बीडच्या पाटोदा शहरात कार्यरत होते. या दरम्यान गंडाळे हे आई व पत्नीची साथ मिळत नाही असे व्हाट्सअप स्टेटस ठेवून बेपत्ता झाले होते. गंडाळे बेपत्ता झाल्याची तक्रारीची नोंद पाटोदा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. यानंतर नातलग, मित्रपरिवारासह पोलिसांकडून देखील शोध सुरु करण्यात आला होता. मात्र शिक्षक गंडाळे हे सापडून आले नव्हते.
दरम्यान शिक्षक राजेंद्र गंडाळे यांचा शोध सुरु असताना त्यांचा मृतदेह पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील धबधब्याजवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून याप्रकरणी आता पाटोदा पोलीसांकडून गंडाळे यांच्या मृत्यूचा तपास करत आहेत.