Saturday, October 5, 2024

नगर शहरातील ‘त्या’ दोन गणेश मंडळातील वाद मिटला

पोलिसांच्या आवाहनानंतर दोन्ही मंडळानी घेतली सामंजस्याची भूमिका

अहमदनगर :: स्वस्तिक चौकात वर्षानुवर्षांपासून बसविण्यात येत असलेल्या गणेश मंडळावरून वाद निर्माण झाला होता. दोन मंडळांमधील वाद सोडविण्यात पोलीस प्रशासनाला यश आले असून दोन्ही मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने वाद मिटला आहे. स्वस्तिक चौकात काही अंतरावर दोन्ही मंडळे गणपती बसविण्यासाठी तयार झाले आहेत.
जनजागृती प्रतिष्ठानचे अनिल शिंदे आणि राजयोग प्रतिष्ठानचे सागर शिंदे यांच्यात स्वस्तिक चौकातील गणपती मंडळावरून वाद निर्माण झाला होता. वाद आता मिटला असून स्वस्तिक चौकामध्ये काही अंतरावर दोन्ही मंडळांकडून गणपती बसविण्यात येणार आहे. वाद असलेल्या स्वस्तिक चौकामध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी वेळोवेळी भेटी दिल्या होत्या. तसेच कोतवाली पोलीस ठाण्यात हा वाद सोडविण्यासाठी बैठकीही झाल्या होत्या. दोन्ही मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेऊन काही अंतरावर गणपती बसविण्यासाठी निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही सूचना पोलीस प्रशासनामार्फत दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून योग्य तोडगा काढल्याबद्दल दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी कोतवाली पोलिसांचे आभार मानले आहेत. यावेळी गोपनीय विभागाचे राजेंद्र गर्गे, योगेश खामकर, देवेंद्र पांढरकर हजर होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles