नगर शहरातील चांदणी चौकात वाहन चालकाने महिलेला लिफ्ट दिली परंतु महिलेने वाहन चालकास पैसे मागून ब्लॅकमेल करायचा प्रयत्न फसला बातमीत हकीकत अशी की, घटनेतील फिर्यादी युवराज निंबाळकर (रा.निगडी,पुणे,मुळ रा. जुन्नेवाडी,ता.पाटोदा) हे शनिवारी दि.१३ जानेवारी रोजी सकाळी नगर सोलापूर रस्त्याने जात असताना चांदणी चौकात फळे घेण्यासाठी थांबले.
तेवढ्यात एक महिला त्यांच्या वाहनात येऊन बसली व पुढे सोडा असे बोलली,तिला लिफ्ट देताच छेड काढल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत या वाहन चालकाकडे तीन हजार रुपये मागितले. वाहन चालक निंबाळकर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून महिले विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वाहनचालकाला महिलेला लिफ्ट देणं पडलं महागात, नगर शहरातील घटना..महिलेने वाहन चालकास..
- Advertisement -