शिक्षक भारती संघटनेच्या प्रयत्नांना यश ;इयत्ता दहावीच्या विज्ञान-१ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण मिळणार
नगर- शिक्षक भारतीच्या निवेदना नंतर इयत्ता दहावीच्या विज्ञान-१ विषयाच्या बोर्डाच्या पेपरमधील संदिग्ध प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण देणे बाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांचे पत्र आज निर्गमित झाले आहे.
दिनांक १८ मार्च रोजी इयत्ता दहावीचा विज्ञान-१ या विषयाचा बोर्डाचा पेपर झाला. यात प्रश्न-१ (B) मधील i क्रमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा.’ या प्रश्नाच्या उत्तराबाबत विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संदिग्धता निर्माण झाली होती म्हणून शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी अध्यक्ष/ सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांना निवेदन दिले होते. म्हणून ‘हायड्रोजन’ आणि ‘हेलियम’ या दोन्ही उत्तरास मार्क मिळणार आहे, अशी माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारती संघटनेचे राज्यसचिव सुनिल गाडगे यांनी दिली.
वैज्ञानिकदृष्ट्या विचार करता त्याचे अचूक उत्तर ‘हायड्रोजन’ हे आहे. मात्र काही शाळांमध्ये याचे उत्तर ‘हेलियम असल्याचे तर काही शाळांमध्ये योग्य उत्तर ‘हायड्रोजन’ असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती.
हायड्रोजनच्या अणुत्रिजेची गणना मूल्य 53 pm आहे तर हेलिअमच्या अणुत्रिजेचे गणना मूल्य 31 pm आहे; कारण जेव्हा आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या कमी होण्याची शक्यता असते. तथापि, हायड्रोजन हा द्वि- आण्वीय वायू आहे तर हेलिअम हा एक अण्वीय बाबू आहे. त्यामुळे, अणुत्रिज्यांच्या गणना केलेल्या मूल्यांची तुलना करणे योग्य नाही, दोन्ही अणूची ‘बॅन दे वॉल्झ’ (Van der Waals) त्रिज्यांची तुलना करणे अधिक योग्य ठरेल. हायड्रोजन अणूची बॅन दे वॉल्झ त्रिज्या ही 120 pm आहे तर हेलिअम अणूची वैन दे वॉल्झ त्रिज्या ही 140 pm आहे.
या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भातील ही संदिग्धता लक्षात घेता या दोन्ही उत्तरांना तूर्त पूर्ण गुण देणे उचित होईल. पुढच्यावेळी सुधारित उत्तरासाठी उचित सुधारणा करता येतील. आता मुलांचे गुण कमी का करायचे? वर्षभर मेहनतीने अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायची इच्छा बाळगणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकरिता एक गुणही अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे याबाबत तातडीने निर्णय जाहीर होणे आवश्यक आहे जेणेकरून विद्यार्थी, पालक यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल, असे निवेदन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांना देण्यात आले होते त्यांनी लगेच ही मागणी मान्य करत विद्यार्थ्यांना दोन्ही उत्तरांना गुण देण्याचे जाहीर केले.
ही मागणी मान्य होण्यासाठी शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनिल गाडगे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा सौ आशा मगर, सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हासचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे . जिल्हा सचिव महेश पाडेकर., संभाजी पवार, कार्यवाह संजय भुसारी . हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, सिकंदर शेख. संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संभाजी चौधरी , श्रीकांत गाडगे . रेवण घंगाळे जॉन सोनवणे .महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, रूपाली बोरुडे. सोनाली अकोलकर विनाअनुदानितच्या अध्यक्षा रूपाली कुरूमकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.