राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर शहर विधानसभा अध्यक्षपदी सागर गुंजाळ यांची निवड जाहीर
उच्च शिक्षित युवकांनी राजकारणातून समाज घडवण्याचे काम करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
नगर : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर शहर विधानसभा अध्यक्षपदी सागर गुंजाळ यांची निवड जाहीर करण्यात आली असून त्यांना निवडीचे पत्र पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले, यावेळी माजी आ.अरुणकाका जगताप, आ.संग्राम जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आदी उपस्थित होते,
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजकारणात उच्च शिक्षित युवकांनी येवून समाजातील प्रश्न समजावून घेत ते सोडवण्याचे प्रयत्न केल्यास नक्कीच शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोहचतील, व राजकारणातून समाज घडवण्याचे काम होईल तसेच या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन होईल, आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला असून त्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने नागरिकांच्या घरांपर्यंत पोहचवावी असे ते म्हणाले.
आ.संग्राम जगताप म्हणाले की , सागर गुंजाळ हा उच्च शिक्षित असून त्याने एमबीएची पदवी मिळवली असून तो नक्कीच राजकारणात चांगले काम करून पदाला न्याय देईल असे ते म्हणाले.
सागर गुंजाळ म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून माझ्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या अहमदनगर शहर विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, त्या माध्यमातून युवकांचे संघटन करून पक्षाचे ध्याय धोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम केले जाईल, तसेच शासनाच्या शिक्षण व नोकरी बाबतच्या विविध योजनांची माहिती युवकांना दिली जाईल, युवकांसाठी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या कार्यशाळेचे आयोजन केले जाईल, युवकांचे बेरोजगारीसह विविध प्रश्न आ. संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले.