महामार्गावरून प्रवास करत असताना तुम्हाला काही ठिकाणी वाहन थांबवून टोल द्यावे लागतात. पण, टोलनाक्यावर गाड्यांची प्रचंड रांग लागलेली असते. यामुळे टोल नाक्यावर टोल भरण्यास जास्त वेळ लागतो. हे पाहून काहीजण टोल नाक्यावर पैसे न भरताच पुढे निघून जातात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पहायला मिळालं आहे. टोल नाक्यावर पैसे न देता निघून जाणाऱ्या ट्रकचालकाकडून टोल घेण्यासाठी कर्मचारी मजेशीर पद्धतीने पाठलाग करताना दिसून आला आहे.
व्हायरल व्हिडीओ ट्रकचालक आणि टोलनाक्यावर टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा आहे. टोलनाक्यावर पैसे न देता एक ट्रकचालक निघून जातो. हे बघताच टोल घेणारा कर्मचारी चालत्या ट्रकवर चढतो. ट्रकचालक वेगात ट्रक घेऊन जातो आहे आणि कर्मचारी ट्रकच्या दरवाजावर लटकताना दिसत आहे. टोल घेणारा कर्मचारी ट्रक चालकास गाडी बाजूला थांबवण्यास सांगतो आहे, पण ट्रकचालक त्याचं ऐकत नाही आणि दादागिरी करण्यास सुरुवात करतो आणि त्यांचा मजेशीर संवाद रंगतो. टोल घेणाऱ्या कर्मचाऱ्याचा आणि ट्रकचालकाचा मजेशीर व्हिडीओ
Kalesh b/w a Toll worker and Truck driver ( Toll tax nahi dia toh Truck pe chaddh gaya🫡) pic.twitter.com/wl0TCKPSTx
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 26, 2023