जबरी चोरी (चैन स्नॅचिंग) गुन्ह्यातील फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद
मा. श्री राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामधील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत आदेश दिलेले आहेत.
नमुद आदेशाप्रमाणे पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, बाळासाहेब खेडकर, विशाल तनपुरे, फुरकान शेख यांचे पथक तयार करुन अहमदनगर जिल्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींची माहिती काढुन त्यांना ताब्यात कारवाई करणेबाबत पथकास मार्गदर्शन करुन पथक रवाना केले होते.
वरील पोलीस पथक दिनांक 30/08/2024 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये फरार आरोपींची माहिती काढत असतांना पथकास गुप्त बातमीदारामार्फत जबरी चोरीच्या गुन्हयातील सराईत आरोपी राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पु घिसाडी हा त्याचे राहते घरी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तात्काळ आरोपीचे राहते घरी येथे जाऊन खात्री केली असता, राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पु घिसाडी, रा. इंदिरानगर, वॉर्ड क्रमांक 03, श्रीरामपूर, जि.अहमदनगर हा घरी मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले.नमूद आरोपीवर दाखल गुन्हयांच्या अभिलेखाची खात्री करता तो संगमनेर शहर पो.स्टे.गु.र.नं. 937/2023 भादवि कलम 392,34 प्रमाणे या गुन्ह्यामध्ये फरार असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपी नामे राजेंद्र भिमा चव्हाण हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुध्द अहमदनगर जिल्ह्यामध्ये जबरी चोरी (चैन स्नॅचिंग) चे एकुण 09 गुन्हे दाखल आहेत.
पथकाने ताब्यातील आरोपीस संगमनेर शहर पो.स्टे.गु.र.नं. 937/2023 भादवि कलम 392,34 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला साहेब,पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग, संगमनेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.