Friday, February 23, 2024

नगर शहरातील शंकर बाबा मठात चोरीची घटना…आरोपी पोलीसांच्या ताब्यात

पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने नगरच्या ब्राम्हणगल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरुन नेली होती. याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३८०,४५७ प्रमाणे दाखल गुन्हा रजि. करण्यात आला होता.मात्र कोतवाली पोलिसांनी कौशल्यपुर्ण तपास करत १२ तासात आरोपी ताब्यात घेतला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,’दि.०७ रोजी कमलेश लक्ष्मण जंजाळे (रा.ब्राम्हण गल्ली माळीवाडा अहमदनगर) यांनी तक्रार दिली की, पहाटे पावणे चारच्या सुमारास अज्ञाताने ब्राम्हण गल्ली माळीवाडा येथील शंकर बाबा सावली मठातील अंदाजे २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल असलेली दानपेटी चोरुन नेली आहे अशा फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास करत असताना कोतवाली पोलीसांनी मंदीरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे सदरचा गुन्हा करणारा आरोपी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसुन आल्याने त्याचा अभ्यास करता चोरी करणारा इसम हा रावश्या असुन तो (माका ता. नेवासा जि अहमदनगर) येथील राहणारा अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाल्याने गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी तात्काळ सदरील ठिकाणी जावुन शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने आपले नाव रोहीदास उर्फ (रोह्या/रावश्या) लक्ष्मण पलाटे (वय ३८) वर्ष रा.मिरी माका ता नेवासा जि अहमदनगर असे असल्याचे सांगितले. अधिक चौकशी करता त्याने प्रथम उडवा उडविची उत्तरे दिली त्यास प्राप्त सीसीटिव्ही पुराव्यांच्या आधारे अधिक विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच चोरलेली दानपेटी हि त्याने गांधी मैदानात एका पडक्या खोलीत लपवुन ठेवल्याची माहीती दिल्याने सदर ठिकाणावरुन चोरी झालेली दानपेटी व त्या मधील रक्कम पंचा समक्ष हस्तगत करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.विश्वास भान्सी हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सपोनि रविंद्र पिंगळे, सपोनि विश्वास भान्सी पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, ए. पी इनामदार, शाहीद शेख, सलीम शेख, अतुल काजळे, अभय कदम, अमोल गाढे, संदिप थोरात, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, इसराईल पठाण, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू, नितीन शिंदे आदींनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles