Wednesday, April 30, 2025

नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्याने पालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनातील खुर्च्यांची तोडफोड.. व्हिडिओ

पाथर्डी :-दोन ठेकेदाराच्या वादातून एका ठेकेदाराने काही तरुण पाठवत दुसऱ्या ठेकेदाराचे काम बंद पाडले या घटनेचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अँड.प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली भिक मागो आंदोलन करत पालिकेतील मुख्याधिकारी यांच्या दालनातल्या खुर्च्यांची मोडतोड केली. विकास कामात होत असलेल्या टक्केवारीच्या घोळाच्या निषेधार्थ मंगळवारी अँड.ढाकणे हे आक्रमक होत त्यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता त्यांच्यासह सत्ताधारी पालिकेच्या माजी पदाधिकाऱ्यांना टीकेचे लक्ष केले.
या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नासिर शेख,आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड,माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे,चांद मणियार,देवा पवार,चंद्रकांत भापकर,योगेश रासने, सिताराम बोरुडे,दिगंबर गाडे, आतिश निऱ्हाळी,भाऊसाहेब धस,जालिंदर काटे,सागर इधाटे,नागनाथ गर्जे,सुनील पाखरे, अविनाश टकले आदी उपस्थित होते.

विकास कामात टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली भीक मागून आंदोलन करत शहरातील प्रत्येक छोट्या मोठ्या व्यावसायिकाकडून एक रुपया जमा करून जमा झालेली रक्कम नगरपालिकेला दान करण्यात आली. तू लोकप्रतिनिधीचा हप्ता दिला नाही म्हणून एका ठेकेदाराने काही तरुण पाठवत दुसऱ्या ठेकेदाराचे काम बंद पाडले त्यामुळे शहरातील नवी पेठ येथील रस्त्याचे काम बंद पडल्यामुळे नागरिक व व्यवसायिकांची अडचण निर्माण झाली आहे. अशा भ्रष्ट अधिकारी व लोकप्रतिनिधीचा निषेध व्यक्त होण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नगरपरिषद मध्ये आंदोलन करते आल्यानंतर या ठिकाणी मुख्याधिकारी नसल्याने सक्षम अधिकाऱ्याकडून उड उडवी चे उत्तर देण्यात आले. संतप्त झालेल्या ढाकणे यांच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या इमारतीवरून मुख्याधिकारी संतोष लांडगे यांची बसण्याची खुर्ची वरून खाली फेकून दिली तर मुख्याधिकारी यांच्या दालनातील असलेल्या प्लास्टिकच्या खुर्च्या याचीही मोडतोड केली.

यावेळी बोलतांना ढाकणे म्हणाले, बाराशे कोटीच्या विकास कामांच्या जाहिराती केल्या, त्यातील किती पैसे तुमच्या खिशात गेले.याचा हिशोब द्यायला मी तयार आहे.त्यासाठी माझी तयारी असून मी सिद्ध करून देतो.गेल्या एक वर्षापासून मतदार संघातील बाराशे कोटीचा विकास कामाचा हिशोब आमच्या बहिण बाईला मागतोय, त्या देत नाही. त्यांची हिंमत होत नाही.आम्ही काही बोललो की, विरोधकांना टीका करण्याशिवाय काय काम?असे मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी म्हणतात मग आता हे टक्केवारीचा पाप कुणी केलं. मार्च एंड येताच मुदतीत काम करायचं आणि बिल काढायचा धंदा या तालुक्यात जोरात सुरूच्या नादात निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. तुम्ही नववर्ष लोकप्रतिनिधी आहात असा एक रस्ता दाखवा का तो आजही चांगल्या दर्जाचा असून सुस्थितीत आहे. तुम्ही म्हणाल ती शिक्षा मी घ्यायला तयार आहे. असे आवाहन ढाकणे यांनी आमदार राजळे यांना दिले. मुठभर तुमच्या बगलबच्चनला हाताशी धरून वाटेल तशा पद्धतीची ठेकेदारी सुरू असून एकूण रकमेच्या वीस ते पंचवीस टाक्यातच काम केली जातात बाकीची रक्कम जाते कुठे? भ्रष्टाचाराने बंधारे,रस्ते निकृष्ट झाले आहेत.लोकशाहीतील लोकप्रतिनिधी टक्केवारीत रमत असेल तर त्या मतदारसंघाचे भले होणार नाही.

पाथर्डी नगरपरिषदेच्या नवीन इमारतीला बाहेरच्या बाजूने ऍक्रोलीक पॅनलिंग व इतर सुशोभीकरणाचं सुमारे दीड कोटीचे काम सुरू असून या कामाबाबत कोणताही ठेका अधिकृतरित्या झालेला नसून या कामासंदर्भात कुठलीही कामाचा कार्यरंभ आदेश संबंधित ठेकेदाराला दिली गेली नाही. कामाचा ठेका होण्याच्या पूर्वीच बेकायदेशीर रित्या काम सुरू आहे. मर्जीतल्या माणसाला ठेका देण्याचा प्रताप पालिका प्रशासनाने केला आहे.या कामात कुणी ठेका भरून नये त्यासाठी दबाव तंत्राचा वापर पालिकेतील कोणत्या अधिकाऱ्याकडून होतो.याचीही चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी करावी असेही नागरिकांचे म्हणणे आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles