Saturday, October 12, 2024

प्राथमिक शिक्षक बँकेची सभा वादळी होणार! नियमबाह्य नोकरभरती, सॉफ्टवेअर खरेदी….

प्राथमिक शिक्षक बँकेत नियमबाह्य नोकरभरती, सॉफ्टवेअर खरेदीसह जाहिराती व संचालक प्रवास भत्त्यामध्ये दुपटीने वाढ करून सभासदाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम संचालक मंडळाने केले असा आरोप शिक्षक नेते संजय धामणे यांनी केला.
पोट नियम दुरुस्तीमध्ये विनापरताव्याचे प्रत्येक सभासदाचे वर्षातून दोन हजार रुपये कपात करण्याचा डाव या संचालक मंडळांनी आखला आहे तो कदापि मान्य केला जाणार नाही ; तसेच सॉफ्टवेअर खरेदी करण्याची गरज नसताना स्वतःचे खिसे भरण्यासाठी सभासदांच्या खिशावर डल्ला मारण्याचे काम संचालक मंडळाने केलेले आहे. सात टक्के व्याजावर बँक चालवण्याचे अभिवचन देऊन सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाला त्याचा विसर पडलेला आहे. नियमबाह्य नोकर भरती करून स्वतःचे हित जोपासण्याचे व स्वतःचे खिसे भरण्याचे काम या संचालक मंडळांनी केले. संचालक प्रवास भत्त्यामध्ये मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी चार लाखांनी अधिक प्रवास भत्ता घेण्याचे पाप व स्वतःची हौस भागवून घेण्यासाठी जाहिराती वरही वारेमाप खर्च करून सभासदांच्या तोंडाला पाने पुसल्यामुळे सभासद संचालक मंडळाला माफ करणार नाही.
नवीन सभासद करून घेण्यासाठी कधी नव्हे तो 7000 रूपये एकरकमी भुर्दंड वसूल केला जात आहे. अशाने नवीन सभासद नोंदणी होईल का ? असा सवाल धामणे यांनी केला आहे.
बँकेने अनेक ठेवीदारांच्या ठेवीवर मिळणारे व्याज सलग दोन वर्षे इन्कम टॅक्स ऑफिसला न कळविल्याने ठेवीदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यासाठी चौकशीअंती सॉफ्टवेअरचे कारण सांगीतले जात आहे, मग असे सदोष सॉफ्टवेअर खरेदीच का केले ? एकंदरीत अशा अनागोंदी कारभारामुळे आणि संचालकामधे बेबनाव निर्माण असल्यामुळे सभासद हिताला हरताळ फासला जात आहे.म्हणून हे संचालक मंडळ विश्वासास पात्र राहिले नसून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकाद्वारे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष श्री सिताराम सावंत, सरचिटणीस विजय महामुनी, मुख्याध्यापक समितीचे जिल्हाध्यक्ष माणिक जगताप , राज्य प्रतिनिधी अनिल आंधळे,संभाजी औटी, प्रल्हाद साळुंखे,पाथर्डी तालुकाध्यक्ष अण्णासाहेब आंधळे, सुखदेव मोहिते, ऋषी गोरे, सुभाष धामणे,संतोष डमाळे, मिलिंद पोटे, रावसाहेब दरेकर, दत्ता जाधव, सुनील लोंढे, विजय कांडेकर,बाळासाहेब गोल्हार महादेव आढाव, संजय कीर्तने, राजन ढोले, गोरक्ष लोहारे, बाळासाहेब भांगरे, दादासाहेब अकोलकर, अनिल अष्टेकर, अशोक मुठे, दत्ता गरुड यांनी केली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles