Wednesday, February 28, 2024

राज्यात १०८ रुग्णवाहिकांची संख्या दुपटीने वाढणार, बोट ॲंब्युलन्स व नवजात शिशूसांठी नव्याने समावेश

बोट ॲंब्युलन्स व नवजात शिशूसांठी विशेष रुग्णवाहिकांचा नव्याने समावेश

पुणे (प्रतिनिधी) राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरली आहे. पुण्यातील भारत विकास गृप (बीव्हीजी) या कंपनीद्वारे १०८ रुग्णवाहिकेची सेवा पुरवली जाते. ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट, बेसिक लाईफ सपोर्ट व बाईक ॲंब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट ॲंब्युलन्सचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

गेल्या १० वर्षात राज्यातील करोडो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. अनेक नवजात बालकांचा जन्म देखील रुग्णवाहिकेत झाला आहे. त्यामुळे १०८ रुग्णवाहिका सेवा राज्यातील नागरिकांसाठी वरदायिनी ठरली आहे.

समुद्र, व नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्याने ३६ बोट ॲंबुलंन्स विविध अपघाती समुद्र किनारे व नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहे. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत.

१०८ रुग्णवाहिकेसाठी सद्यस्थितीत प्रती महिना ३३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागत होते. रुग्णवाहिकेच्या वाढत्या संख्येमुळे प्रती महिना ६३ कोटी रुपये शासनाला खर्च करावे लागणार आहे. एकंदरीतच अतिरिक्त ३० कोटी प्रतीमहिना शासनाला खर्च करावा लागणार आहे.

सद्यस्थितीत रुग्णवाहिकांची संख्या
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : २३३
बेसिक लाईफ सपोर्ट : ७०४
बाईक ॲंब्युलंन्स : ३३

नव्याने वाढणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या
ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट : २२
बेसिक लाईफ सपोर्ट : ५७०
बाईक ॲंब्युलंन्स : १६३
नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका : २५
बोट ॲंब्युलन्स : ३६

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles