अहमदनगर : शहरामधुन रात्री १०.०० वाजेनंतर जड वाहतुकीस परवानगी असल्यामुळे या वेळेत मोठ्या प्रमाणात चौका-चौकात वाहतुक कोंडी होत असते. डी एस पी चौक, चांदणी चौक, कायनेटीक चौक हे हॉस्पिटलशी निगडीत चौक असल्यामुळे अशा महत्वाच्या सिग्नल असणा-या चौकात या वेळेत कुठल्याच प्रकारे पोलिस कर्मचारी हजर नसतात तसेच सिग्नल देखील चालु नसतात या मुळे सर्व चौकामध्ये वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात होते अश्या वेळेस अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिकेला देखिल जाण्यासाठी जागा मिळत नाही.
तसेच अपघातचे प्रमाण देखील वाढले असून या चौकांमध्ये काहींचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाले आहे, मोठी दुर्घटना होण्याची दाट शक्यता आहे. तरी आपण रात्री १०.०० नंतर येणा-या जड वाहनांना रात्री ०१.०० नंतर परवानगी देण्यात यावी जेणे करुन नुकत्याच झालेल्या कायनेटीक चौक येथील दुर्घटना पुन्हा पुनरावृत्ती होणार नाही आणि शहरातील नागरीकांना वाहतुक कोंडीचा त्रास देखिल होणार नाही. तरी आपण लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करुन शहरातुन होणा-या जड वाहतुकीला रात्री १.०० नंतर परवानगी दयावी अन्यथा आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले जाईल. असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे यांनी पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून दिला आहे. यावेळी सलमान बेग, शहजाद खान, अनिकेत कोळपकर ,संकेत झोडगे, ऋषिकेश बागल, तन्मय शिंदे, सागर विधाते, दिनेश लंगोटे, सागर चवंडके, अविनाश फसले ,अमित कानडे, स्वप्निल भोरे ,तुषार भोस, विकास शिरसाठ, शुभम शेटे ,साहिल घोरपडे आदी उपस्थित होते.