नगर तालुका (प्रतिनिधी) – दीपावली सणामुळे नगर बाजार समितीच्या नेप्ती कांदा मार्केट मधील कांद्याचे सोमवारी (दि.२८ ऑक्टोबर) तसेच गुरुवारी (दि.३१ ऑक्टोबर) रोजी होणारे लिलाव बंद राहणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली आहे. शनिवार (दि.२ नोव्हेंबर) रोजी लिलाव पूर्ववत होणार आहेत.
दरम्यान सर्व शेतकरी बंधूंना कळविण्यात येते की, जिल्हा हमाल पंचायतचे अध्यक्ष यांनी पत्र देवून दीपावली सणानिमित्त यार्डमध्ये काम करणारे हमाल व मापाडी बंधूनाही दीपावली सण असलेने व दीपावली सण(लक्ष्मीपूजन) शुक्रवारी (दि.१ नोव्हेंबर) रोजी असलेने आडत्यांनी आपल्या आस्थापनेवर येणारी आवक शनिवार (दि.२ नोव्हेंबर) सकाळी घेवून येण्यासाठी शेतकऱ्यांना माहिती प्रसारित करावी. असे आवाहन केलेले आहे.
त्यामुळे तसेच सर्व शेतकरी बंधूंनी याची नोंद घेवून आपला शेतमाल शनिवारी (दि.२ नोव्हेंबर) सकाळी विक्रीसाठी आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे व उपसभापती रभाजी सुळ तसेच सचिव अभय भिसे व सह.सचिव संजय काळे यांनी केले आहे. सर्व हमाल व मापाडी शनिवारी (दि.२ नोव्हेंबर) सकाळी ७ वाजता उपस्थित राहतील असे चर्चेअंती निर्णय झाला आहे.